Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्रीय पदाधिकारी निवड जाहीर



चांदूर बाजार दिनांक ३(ग्रामीण उदय प्रतिनिधि): 

शिरजगाव कसबा ब्रह्मांडनायक मध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची केंद्रीय वार्षिक सभा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांचे अध्यक्ष खाली पार पडली असून यामध्ये राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आलेली आहे.

     पत्रकार संघाचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारत असल्यामुळे संघाचे कार्य नियोजन बद्ध रीतीने होण्या करिता राष्ट्रीय कार्यकारणी मध्ये बदल करण्यात आले आहे.

अशोक पवार_ केंद्रीय सरचिटणीस,

 रवींद्र मेंढे _केंद्रीय चिटणीस, कैलास बापू देशमुख_महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व राष्ट्रीय संघटक पदभार,

सागर सवळे_ राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख,

अरुण कुलथे _राष्ट्रीय संपर्कप्रमुख यांची निवड जाहीर करण्यात आलेली आहे.

   या केंद्रीय कार्यकारणीच्या सभेला  राष्ट्रीय कार्याध्यक्ष युसूफखान यासीनखान पठाण, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे ,प्रदीप जोशी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख, राष्ट्रीय सरचिटणीस अशोक पवार , राष्ट्रीय चिटणीस रवींद्र मेंढे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष अशोक याऊल, राष्ट्रीय संपर्कप्रमुख अरुण कुलथे, केंद्रीय कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे, राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख सागर सवळे, केंद्रीय महिला संघटक सौ.जयश्री पंडागरे, केंद्रीय विधी सल्लागार किरण भुते, केंद्रीय सदस्य बाळासाहेब सोरगीवकर, मनोहर चरपे, अंबादास सिनकर हजर होते.


Post a Comment

0 Comments