१४ ऑगस्ट नावनोंदणी अर्ज सादर करण्याची अंतीम मूदत
ऑनलॉईन नावनोंदणी अर्ज सादर करण्यासाठी http://msbos.mh-ssc.ac.in संकेतस्थळ उपलब्ध
अमरावती दि. ५ :महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये प्राथमिकस्तर इयत्ता पाचवी व उच्च प्राथमिकस्तर आठवीसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज स्वीकारण्यास मदत वाढ देण्यात आली असून १४ ऑगस्ट ही अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत राहील. संबंधित विद्यार्थ्यांनी व पालकांनी याची नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ पुणे चे प्रभारी सचिव प्रमोद गोफणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
ऑनलाईन नाव नोंदणी अर्ज भरण्याचा व कागदपत्रे स्वीकारण्याबाबतचा तपशील पुढील प्रमाणे दि. १ ते १४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी अर्ज भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये दि. १९ ते २९ ऑगस्ट पर्यंत जमा करावे दि. ४ ऑगस्ट २०२५ पर्यंत संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळाकडे जमा करावी. मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता पाचवी व आठवीसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा तसेच अर्ज भरतेवेळी संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही मंडळाव्दारे कळविण्यात आले आहे.
******
Post a Comment
0 Comments