“घरातील सोन्याचा स्रोत सांगणे महिलांना बंधनकारक: सर्वोच्च न्यायालय”

 


छाप्यादरम्यान महिलांकडे ५०० ग्रॅमपर्यंत सोने जप्त करण्यास सूट असली तरी, ते सोने घरात कोठून आले याचा स्रोत सांगणे बंधनकारक आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

 घरात असलेले सोने कोठून आले याचा स्रोत (माहिती) महिलांनी अधिकाऱ्यांना सांगितलाच पाहिजे. केवळ ५०० ग्रॅमच्या मर्यादेपर्यंत जप्तीतून सूट मिळते, या आधारावर महिलांची या जबाबदारीतून सुटका होऊ शकत नाही.

न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन आणि न्यायमूर्ती अरुण पल्ली यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, "सोने जप्त न होणे आणि ते स्वतःच्या मालकीचे असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत."

आयकर विभागाचा नियम आणि गैरसमज
देशातील आयकर नियमांनुसार, आयकर विभागाच्या छाप्यादरम्यान विवाहित महिलेकडे ५०० ग्रॅमपर्यंत सोने आढळल्यास अधिकारी ते जप्त करू शकत नाहीत.
 या नियमाचा फायदा घेऊन अनेकांनी असा समज करून घेतला होता की, ५०० ग्रॅमपर्यंतच्या सोन्याबाबत कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नसते.
 सर्वोच्च न्यायालयाने हा गैरसमज दूर करत स्पष्ट केले की, जप्तीतून सवलत असली तरी संबंधित सोन्याचा स्रोत स्पष्ट करणे आवश्यक आहे.

Previous Post Next Post

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday