जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना फायर, इलेक्ट्रिकल ऑडिट बंधनकारक - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, September 7, 2026

जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना फायर, इलेक्ट्रिकल ऑडिट बंधनकारक


 

*आरोग्य यंत्रणेची उच्चस्तरीय बैठक


 

अमरावती, दि. ८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये अग्निसुरक्षा आणि विद्युत सुरक्षितता बळकट करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव सभागृहात उच्चस्तरीय बैठक पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी या बैठकीत महत्वाचे निर्देश दिले.

 

बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षिरसागर, कार्यकारी अभियंता (विद्युत) आणि जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

 

बैठकीत रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गांधी यांनी दिले. यासाठी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच केवळ कागदोपत्री पूर्तता न करता प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने उपाययोजना करता याव्यात, यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्र आणि रुग्णालयात नियमितपणे 'मॉक ड्रिल' आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

 

वीज यंत्रणेतील बिघाडामुळे होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी इलेक्ट्रिकल ऑडिटला विशेष प्राधान्य देण्याचे सांगण्यात आले आहे. मुदतीत काम पूर्ण केले नसल्यास प्रशासनाकडून कारवाईचा इशाराही देण्यात आला. सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही मोहीम गांभीर्याने राबवून रुग्णालयांची सुरक्षा यंत्रणा चोख ठेवावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages