'ती' नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद; वन विभागाच्या विशेष पथकाची मोठी कारवाई - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, September 7, 2026

'ती' नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद; वन विभागाच्या विशेष पथकाची मोठी कारवाई

 अमरावती दि.८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :


गेल्या काही दिवसांपासून अमरावती व वर्धा जिल्ह्यात दहशत निर्माण करणाऱ्या आणि चार निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या उपद्रवी वाघिणीला अखेर वन विभागाच्या विशेष पथकाने आज चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा परिसरात या गुंगीचे औषध देऊन यशस्वीरीत्या जेरबंद करण्यात आल्याची माहिती अमरावतीचे उपवनसंरक्षक (प्रादेशिक) अर्जुना के.आर. यांनी दिली आहे.


या यशस्वी कारवाईमुळे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि चांदूर बाजार तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. या नरभक्षक वाघिणीने गेल्या २० दिवसांत चार जणांचा बळी घेतला.वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यापासून वाघीणीने प्रवास सुरू केला होता. तेथून अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी आणि चांदूर बाजार तालुक्यांत प्रवास करताना तिने पाळीव प्राण्यांवर हल्ले केले तसेच ४ जणांना ठार केले.


वाघिणीच्या हल्ल्यात

१७ ऑगस्ट रोजी रामभाऊ भोयर (वय ७४) (नरसिंगपूर, जि. वर्धा),२७ ऑगस्ट रोजी चरणदास ईखे (वय ५५) (भांबोरा, ता. मोर्शी), 6 सप्टेंबर रोजी उर्मिला बाजीराव इवने (वय १८)(सोनोरी, ता. चांदूर बाजार),७ सप्टेंबर रोजी दिनेश आवारे (वय ४५) (शिरजगाव कसबा, ता. चांदूर बाजार) मृत्युमुखी पडले.

सोनोरी येथे १८ वर्षीय तरुणीचा बळी गेल्यानंतर आणि २४ तासांच्या आत शिरजगाव कसबा येथे दुसरी घटना घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र जनक्षोभ व संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व शोधमोहीम वाघिणीचा वाढता उपद्रव पाहता वन विभागाने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली होती.

वाघिणीचा माग काढण्यासाठी २४ तास २४ तास गस्त (आरआरटी), कॅमेरा ट्रॅप, थर्मल ड्रोन आणि दवंडीद्वारे जनजागृती अभियान राबविण्यात आले होते.


परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

वन विभागाची तातडीची आर्थिक मदत

वनविभागाच्या पथकाने तांत्रिक बाबींचा आधार घेत वाघिणीला सुरक्षितपणे बेशुद्ध केले, ज्यामुळे परिसरातील मोठा धोका टळला आहे. दरम्यान, वाघिणीच्या हल्ल्यात मृत पावलेल्या सर्व नागरिकांच्या कुटुंबांना वन विभागाच्या वतीने तातडीची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages