मंत्र्यांना फोन लावून नवनीत राणा यांनी सुनावले; वनविभागाची यंत्रणा अलर्ट मोडवर
(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) / अमरावती:
परिसरात वाघिणीच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेत माजी खासदार नवनीत राणा यांनी थेट संबंधित मंत्र्यांना फोन लावून परिस्थितीची जाणीव करून दिली आणि प्रशासनाला तातडीने आदेश दिले.
"वाघिणीचा शोध घेण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत उशीर नको, तातडीने हेलिकॉप्टरची व्यवस्था करा आणि शोधमोहीम तीव्र करा," अशा कडक शब्दांत नवनीत राणा यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.
वाघिणीचा तातडीने बंदोबस्त करावा, वनविभागाने आधुनिक तंत्रज्ञान व ड्रोन/हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शोध घ्यावा आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी ठाम मागणी त्यांनी यावेळी केली. नवनीत राणा यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर वनविभाग व स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून शोधमोहीम अधिक गतिमान करण्यात आली आहे.