शिरजगाव कसबा परिसरात वाघाची दहशत कायम; आणखी एका निष्पाप जीवाचा बळी!
दि.७ शिरजगाव कसबा :-
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार परिसरात नरभक्षक वाघिणीची मोठी दहशत पसरली आहे. शिरजगाव कसबा नजीकच्या परिसरात वाघाच्या हल्ल्यांची मालिका सुरू असून, अलीकडेच झालेल्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
रविवारी घडलेल्या सोनोरी येथील या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून संतप्त गावकऱ्यांनी वन विभागाच्या बेजबाबदार कारभाराविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार प्रवीण तायडे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांच्या वाढत्या दबावानंतर प्रशासनाने गावात मोठा पोलीस आणि वन कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात केला आहे.
लागोपाठ हल्ले: आता ४ था बळीची भीती
मिळालेल्या माहितीनुसार, शिरजगाव कसबा मधील आवारे या व्यक्तीचा बळी घेण्यात आला आहे. आवारे हा शेतात काम करत असतांना वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्या ठार केल्याची बातमी मिळत आहे.
वाघाच्या वाढत्या दहशतीमुळे शिरजगाव कसबा आणि आजूबाजूच्या आवारे व इतर गावांमधील शेतकरी आणि मजुरांनी शेतात जाणे पूर्णपणे बंद केले आहे.
वन विभागाचे आवाहन
- पोलीस तपास करत आहेत. पुढील माहिती तुम्हाला देण्यात येईल.
वन विभागाने सोनोरी, शिरजगाव कसबा आणि लगतच्या गावांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे.
नागरिकांनी शेतात किंवा जंगलाजवळ एकटे जाणे टाळावे.