शासकीय आश्रमशाळा शिक्षक भरतीसाठी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरु - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, September 3, 2026

शासकीय आश्रमशाळा शिक्षक भरतीसाठी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरु


 

अमरावती दि. ४ : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक संवर्गातील गट-क पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलमार्फत शिफारस प्राप्त झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया गुरुवार पासून सुरू झाली. यासंदर्भातील सविस्तर जाहीर सूचना व वेळापत्रक नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर अपर आयुक्त कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार संपूर्ण पडताळणी प्रक्रिया शनिवार पर्यंत पार पडणार आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या २४२१ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.  शिक्षण आयुक्तालयाकडून मुलाखतीशिवाय निवड झालेल्या प्राथमिक शिक्षक- ९२७, माध्यमिक शिक्षक- ४२१ आणि उच्च माध्यमिक शिक्षक-  २५२ अशा एकूण १६०० उमेदवारांची यादी प्राप्त झाली आहे. त्यात  पेसा क्षेत्रातील ४५९ तर नॉन-पेसा क्षेत्रातील ११४१ उमेदवारांचा समावेश आहे. संबधित उमेदवारांच्या मुळ शैक्षणिक अर्हता कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. नाशिक विभागात सर्वाधिक पात्र ५८८ उमेदवार असून, त्याखालोखाल ठाणे विभागात ४२४ उमेदवार, नागपूर विभागात २९६ उमेदवार तर अमरावती विभागात २९२ उमेदवार आहे. 

 

संबंधित उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदविलेल्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ आवश्यक असलेली सर्व मूळ प्रमाणपत्रे, जाहिरातीनुसार लागणारी कागदपत्रे आणि प्रत्येक कागदपत्राची एक साक्षांकित (self-attested) छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. निर्धारित केलेल्या दिनांक व वेळेत अनुपस्थित राहिल्यास त्याबाबतची सर्व जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहणार आहे. पात्र उमेदवारांची सविस्तर यादी https://tribal.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला वेळोवेळी भेट  देण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

 


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages