नागरिकांच्या समस्या निवारणासाठी दररोज वेळ राखीव - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, September 4, 2026

नागरिकांच्या समस्या निवारणासाठी दररोज वेळ राखीव

 

*अभ्यागतांसाठी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत भेटी अनिवार्य

 

अमरावती, दि. ५: जिल्ह्यातील सर्व शासकीय व महसूल विभागाच्या कार्यालय प्रमुखांनी नागरिकांच्या अडचणी व तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी दररोज दुपारी ३ ते ५ या वेळेत अभ्यागतांना भेटणे अनिवार्य करण्यात आले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी परिपत्रक जारी केले आहे.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुद्रांक जिल्हाधिकारी तसेच भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी दररोज दुपारी ३ ते ५ ही वेळ नागरिकांच्या भेटीसाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. राखीव वेळेत विभाग प्रमुखांनी शक्यतो स्वतः उपस्थित राहून नागरिकांची निवेदने, तक्रारी ऐकून त्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई करावी लागणार आहे. ज्या प्रकरणांचे तात्काळ निवारण शक्य नाही, त्यांची नोंद घेऊन विहित कालमर्यादेत कार्यवाही करणे बंधनकारक राहील.

 

अत्यावश्यक शासकीय बैठका किंवा अपरिहार्य प्रशासकीय कारणांमुळे विभाग प्रमुख उपस्थित राहू शकत नसल्यास, त्यांच्या जागी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करावे. नागरिकांना विनाकारण ताटकळत राहावे लागू नये आणि कार्यालयीन कामकाज अधिक सुरळीत व परिणामकारक व्हावे, यासाठी या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

 


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages