अमरावती, दि ५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : ‘इंडिया स्किल्स स्पर्धा २०२६-२७’साठी ऑनलाईन नोंदणी सुरु असून जिल्ह्यातील तंत्रकुशल व व्यावसायिक कौशल्यधारक उमेदवारांना १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
इंडिया स्किल्स स्पर्धेच्या माध्यमातून २३ वर्षांखालील उमेदवारांना जिल्हा , राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या स्पर्धेद्वारे विविध तांत्रिक,व्यावसायिक,डिजिटल आणि मेकॅट्रॉनिक्स कौशल्यांमध्ये सहभाग घेता येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या उमेदवारांस आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे. तसेच आकर्षक पारितोषिके, प्रमाणपत्रे आणि मार्गदर्शनही मिळणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा हा एकमेव निकष ठेवण्यात आला आहे. वैयक्तीक सहभागासाठी ५६ क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००३ किंवा त्यानंतर झालेला असावा.तसेच ऑटोनॉमस मोबाईल रोबोटिक्स,काँक्रिट कन्स्ट्रक्शन वर्क, लँडस्केप गार्डनिंग या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००६ किंवा त्यानंतर झालेला असावा. सायबर सिक्युरिटी,इंडस्ट्री ४.०,मॅकॅट्रोनिक्स,रोबोट सिस्टिम इंटीग्रेशन या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००३ किंवा त्यानंतर झालेला असावा.
शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय),पॉलेटेक्निक,इंजिनियरीं
या स्पर्धेत सहभागासाठी इच्छुक उमेदवारांना skillindiadigital.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार च उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.