यवमाळ
19/9/2026
क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन क्रीडा संकुल यवतमाळ येथे करण्यात आले होते ..स्मॉल वंडर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी नैतिक महेंद्र महाजन वर्ग दहावीत शिक्षण घेत आहे.
60 ते 63 वजन गटात बॉक्सिंग खेळात उत्तम खेळाचे प्रदर्शन करत नैतिक महाजन ने यवतमाळ येथे जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम बाजी मारली. विभागीय स्तरावर नैतिक महाजन ची निवड झालेली आहे .विभागीय स्तरावर निवड झाल्याबद्दल शंकर गुलाबराव मालखेडे क्रीडा शिक्षक आणि प्राचार्य डॉ. मंजुषा सागर अहमद शेख, अतुल बेंदूरकर, प्रेमकुमार इंगोले, वैभव करडे मेघा शेंडे, प्रीती टापरे, रोशन खैरे,यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले .विद्यार्थ्यांची विभागीय निवड झाल्यामुळे स्मॉल वंडर स्कूलचे शिक्षक वृंद अहमद शेख, अतुल भेदुरकर, अक्षय वानखेडे,रोशन खैरे ,प्रीती टापरे, मेघा शेंडे सह सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .पालक विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.