पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस; लोकभवन येथे रक्तदान शिबीर संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, September 19, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस; लोकभवन येथे रक्तदान शिबीर संपन्न


 


           मुंबई, दि. १९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  राज्य शासनातर्फे दिनांक १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत 'सेवा संकल्प अभियान' राबविण्यात येत आहे.  या अभियानांतर्गत महाराष्ट्र लोकभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. 

            हे शिबीर इंडियन रेड क्रॉस सोसायटी, मुंबई शाखा, पंडित दीनदयाल उपाध्याय सेवाभावी ट्रस्ट, नांदेड व इस्कॉनच्या अन्नामृत फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले. यावेळी लोकभवनचे अधिकारी, कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान व मुंबई तसेच एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. 


            शिबिराला इंडियन रेड क्रॉस सोसायटी महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष होमी खुसरोखान, एसएनडीटी महिला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, पंडित दीनदयाल उपाध्याय सेवाभावी ट्रस्टचे विश्वस्त डॉ. सुमेध चव्हाण, इस्कॉनच्या अन्नामृत फाउंडेशनचे सदस्य गोरक्ष गंभीरे, जेजे हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. संजय सुरासे, डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ व रेड क्रॉस सोसायटी मुंबईचे तंत्रज्ञ उपस्थित होते.     


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages