गौ तस्करांचा मदतगार बजरंग दलाचा सुरज जगबहादुर बैस अटकेत! - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, September 22, 2026

गौ तस्करांचा मदतगार बजरंग दलाचा सुरज जगबहादुर बैस अटकेत!

 


परतवाडा पोलिसांची कारवाई; चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा


 परतवाडा दिनांक २२ 

(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)


 गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीला मदत केल्याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला अटक केली आहे. 

     सूरज जंगबहादूर बैस (ठाकूर) (वय २६, रा. खामला, ता. भैंसदेही, जि. बैतूल, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या चौकशीत त्याने गोवंश खरेदी करून देणे तसेच तस्करीच्या वाहनांना पुढे सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देत असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री परतवाडा डी.बी. पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, एका बोलेरो वाहनातून गोवंश निर्दयतेने कोंबून तस्करी केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत महिंद्रा बोलेरो वाहन अडवून तपासणी केली. वाहनामध्ये ९ गोवंशीय जनावरांना अत्यंत क्रूर पद्धतीने कोंबून नेले जात असल्याचे आढळून आले.पोलिसांनी घटनास्थळीच तीन आरोपींना अटक करून ९ गोवंशीय जनावरांची सुटका केली. तस्करीसाठी वापरण्यात आलेल्या महिंद्रा बोलेरो वाहनासह एकूण २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.गुन्हा दाखल; तपासाला सुरुवात-या प्रकरणी परतवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६६५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाच्या कलम ५(ब), ९(अ) आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ११(१)(डी), (ई), (एफ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.तांत्रिक तपासातून आरोपीचा शोध-प्रकरणाच्या तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. या तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे परतवाडा डी.बी. पथकाने मध्य प्रदेशातील खामला येथे छापा टाकला. यावेळी सूरज जंगबहादूर बैस याला पोलिसांनी ताब्यात घेतले.पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने, “मी कसाईंसाठी गायी खरेदी करण्यास मदत करतो. त्यांच्या वाहनांना खामला येथून ग्राम कोकरूपर्यंत सुरक्षितपणे पुढे जाण्यास मदत करतो. त्याबदल्यात मला पैसे मिळतात,” असे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.या प्रकरणामध्ये आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई - ही कारवाई अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलिस अधीक्षक दत्ता तोटेवाड, सहायक पोलिस अधीक्षक तथा अचलपूर उपविभागीय पोलिस अधिकारी ईशानी आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली परतवाडा पोलिस ठाण्याचे ठाणेदार अजय आकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.या पथकात एपीआय सलीम शेख, सचिन होले, सुधीर राऊत, घनश्याम किरोळे, शुभम शर्मा, जितेश बाबील, सचिन कोकणे आणि चंद्रशेखर वानखडे यांचा सहभाग होता.

जप्त मुद्देमाल :- १)९ गोवंशीय जनावरांची सुटका, २) तस्करीसाठी वापरलेली १ महिंद्रा बोलेरो गाडी,३)एकूण जप्त मुद्देमाल : २ लाख ८० हजार रुपये आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages