17 सप्टेंबर रोजी भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा संवाद - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, September 8, 2026

17 सप्टेंबर रोजी भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा संवाद


 

विद्यार्थी,उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद


 

 

अमरावती, दि. ९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स येत्या १७ सप्टेंबर रोजी अमरावती येथे येणार आहे. या भेटी दरम्यान टास्क फोर्स् सदस्य हे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार आहेत.

 

            राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे. या कार्यक्रमांतर्गत स्टास्क फोर्स १७ सप्टेंबर २०२६ रोजी अमरावती येथे  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात संवाद साधणार आहेत. या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत.

                  amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय पाठवू शकतात.

 

            टास्क फोर्स येत्या १२ ते ३० सप्टेंबर दरम्यान राज्यातील ६ महसुली विभागाला भेट देणार असून  या विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील.                                                  

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages