जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, August 17, 2026

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा



जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

उत्कृष्ट कार्यासाठी जिल्ह्यातील विविध अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार


 

अमरावती, दि.१८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्हाधिकारी कार्यालयात 80 वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 

         स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात देशप्रेम व उत्साहाचे वातावरण होते. वंदेमातरम् गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्याने कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् गीताने झाली. यानंतर   जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली यावेळी पोलीस बँड पथकाकडून राष्ट्रगीत व महाराष्ट्र सादर झाले.


 

     यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय व  विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व उपस्थिती विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांना जिल्हाधिकारी यांनी  महिलांचे लैंगीक शोषण प्रतिबंध कायदा, नशामुक्ती, जलसंधारण आणि साक्षरतेची शपथ दिली.


जिल्हा स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान

 

जिल्हास्तरावर उत्कृष्ट  कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी प्रमाणपत्र देऊन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.जिल्हाधिकार्यालयातील निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून गौरविण्यात आले.तिवसा तहसीलदार मयुर कळसे आणि अचलपूरचे तहसीलदार सुदर्शन शहारे यांना उत्कृष्ट तहसीलदाराच्या पुरस्काराने गौरविण्यात. धारणी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार राजेश माळी यांना उत्कृष्ट नायब तहसीलदार म्हणून गौरविण्यात.

 

          तहसिल कार्यालय, अंजनगाव सुर्जी चे सहायक  महसूल अधिकारी राहुल चव्हाण,मोर्शी तहसिल कार्यालययातील मंडळ अधिकारी मेघा खाडे, जिल्हधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक प्रतिक पावडे,तहसिल कर्यालय अंजनगाव सुर्जी चे ग्राम महसूल अधिकारी मनोज रुमाले,उपविभागीय अधिकारी कार्यालय चांदुर रेल्वेचे लघुलेखक बंटी कावरे,तहसिल कार्यालय, अचलपुर येथील वाहन चालक नंदकिशोर पावडे,अमरावती तहसिल कार्यालयाचे शिपाई मुन्ना तडोला,तहसील कार्यालय येथील  धामणगाव रेल्वे महसूल सेवक-कोतवाल नितीन पडधान कोतवाल, तहसील कार्यालय, भातकुली अंतर्गत पोलीस पाटील प्रशांत वानखडे आणि जिल्हास्तरावर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विषयक उत्कृष्ट कार्य करणारे शोध व बचाव पथक प्रमुख सचिन धरमरकर यांना उत्कृष्ट कार्यासाठी गौरविण्यात आले.

 

      जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वंदे मातरम आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वंदे मातरम आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

            

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages