जिल्हास्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी प्रमाणपत्र देऊन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.जिल्हाधिकार्यालयातील निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून गौरविण्यात आले.तिवसा तहसीलदार मयुर कळसे आणि अचलपूरचे तहसीलदार सुदर्शन शहारे यांना उत्कृष्ट तहसीलदाराच्या पुरस्काराने गौरविण्यात. धारणी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार राजेश माळी यांना उत्कृष्ट नायब तहसीलदार म्हणून गौरविण्यात.
तहसिल कार्यालय, अंजनगाव सुर्जी चे सहायक महसूल अधिकारी राहुल चव्हाण,मोर्शी तहसिल कार्यालययातील मंडळ अधिकारी मेघा खाडे, जिल्हधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक प्रतिक पावडे,तहसिल कर्यालय अंजनगाव सुर्जी चे ग्राम महसूल अधिकारी मनोज रुमाले,उपविभागीय अधिकारी कार्यालय चांदुर रेल्वेचे लघुलेखक बंटी कावरे,तहसिल कार्यालय, अचलपुर येथील वाहन चालक नंदकिशोर पावडे,अमरावती तहसिल कार्यालयाचे शिपाई मुन्ना तडोला,तहसील कार्यालय येथील धामणगाव रेल्वे महसूल सेवक-कोतवाल नितीन पडधान कोतवाल, तहसील कार्यालय, भातकुली अंतर्गत पोलीस पाटील प्रशांत वानखडे आणि जिल्हास्तरावर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विषयक उत्कृष्ट कार्य करणारे शोध व बचाव पथक प्रमुख सचिन धरमरकर यांना उत्कृष्ट कार्यासाठी गौरविण्यात आले.
जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वंदे मातरम आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वंदे मातरम आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.