"पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात" 347 उमेदवारांची प्राथमिक निवड - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 20, 2026

"पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात" 347 उमेदवारांची प्राथमिक निवड



 

अमरावती, दि. २१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : स्वामी विवेकानंद विद्यार्थी भवन अमरावती विद्यापीठ परिसर येथे 18 ऑगस्ट  रोजी आयोजित 'पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध कंपन्या व बँकांनी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे एकूण 347 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. 


 

           संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती विद्यार्थी विकास विभाग,कौशल्य विकास विभागीय आयुक्तालय अमरावती आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून 721 उमेदवारांनी नोंदणी केली. यातील 562 उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती दिल्या. आदित्य अनधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., अभिनंदन को-ऑपरेटिव्ह बँक लि., जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक लि., महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स प्रा. लि., क्रेडिट एक्सेस ग्रामीण लि. आणि श्रीराम फायनान्स लि. या सहा कंपनी व बँकांच्या प्रतिनिधींनी या रोजगार मेळाव्यात सहभागी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेवून विविध पदांसाठी 347 उमेदवरांची प्राथमिक निवड केली आहे.


 

            विभागीय रोजगार मेळावा समन्वयक समितेचे अध्यक्ष किरण पातुरकर  यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन झाले  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.महेंद्र ढोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कृषी विभागाचे सहसंचालक गणेश घोरपडे, जिल्हा स्तरीय रोजगार मेळावा समन्वय समितीचे अध्यक्ष भूषण काळमेघ आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब मोगले यांनी केले तर   जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी आभार मानले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages