मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, August 20, 2026

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर


                                       

अमरावती, दि.२० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात  विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारीत कार्यक्रमानुसार 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

 

            मतदान केंद्रांची पुनर्रचना 24 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.  31 ऑगस्ट रोजी मतदार याद्यांची प्रारुप  प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यानंतर 31 ऑगस्ट ते 30  सप्टेंबर पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहे. 31  ऑगस्ट ते 29 नोव्हेंबर पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत.  4 नोव्हेंबर  रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशी माहिती  उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली आहे.

                               

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages