शासनमान्य ग्रंथालयांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, July 21, 2026

शासनमान्य ग्रंथालयांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन



अमरावती, दि. २२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :
केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या अर्थसहाय्य योजनेसाठी दि. 21 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सन 2026-27 साठी विविध समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावा. सन 2026-27 साठीच्या समान निधी योजनेत इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना कमाल 25 लाख रूपये, सन 2026-27 साठीच्या असमान निधी योजनेत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तार यासाठी अर्थसहाय्यात फर्निचर खरेदी 4 लाख रूपये व प्रस्ताव फक्त एकदाच इमारत बांधकाम 10 ते 15 लाख रूपये, ‘ज्ञान कोपरा’ विकसित करण्यासाठी 2.50 लाख रूपये, विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरणासाठी 2 लाख रूपये, महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी 6.20 लाख रूपये व इमारत विस्तार 10 लाख रूपये, राष्ट्रीयस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य 1.50लाख रूपये, 2.50 लाख रूपये. 3 लाख रूपये, ‘बालकोपरा’ स्थापन करण्याकरीता 6.80 लाख रूपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास पाठवावेत. तसेच राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे ऑनलाईन पाठविण्यात यावे, असे आवाहन  जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. अ. पुं. वानखडे यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages