अमरावतीत दोन छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, July 21, 2026

अमरावतीत दोन छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर




अमरावती, दि. २२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बडनेरा विधानसभा मतदारसंघाकरीता गुरूवार, दि. 23 जुलै रोजी आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात आणि अमरावती विधानसभा मतदारसंघाकरीता शनिवारी, दि. 25 जुलै 2026 रोजी आमदार सुलभा खोडके यांच्या नेतृत्वात श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सकाळी 10 वाजता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबीरामध्ये नागरिकांना विविध शासकीय व निमशासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामध्ये रेशन कार्ड, संजय गांधी योजनेंतर्गत लाभ, महिलांना शेतकरी दर्जा देणे, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, सातबारामधील चुकांची दुरुस्ती, कर्ज वाटप शेतीशी निगडीत साहित्याचे वाटप, आयुष्यमान कार्ड वाटप, माहिलांना एसटी महामंडळाचे देण्यात येणारे स्मार्ट कार्ड वितरण, आधारकार्ड दुरुस्ती आदी सुविधांची माहिती आणि वितरण करण्यात येणार आहे.

नागरिकांनी शिबाराला उपस्थित राहावे, तसेच शासकीय योजनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages