आदिवासी वसतिगृहासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात इमारतीचा शोध १८० विद्यार्थ्यांच्या निवासासाठी इमारत हवी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, July 13, 2026

आदिवासी वसतिगृहासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात इमारतीचा शोध १८० विद्यार्थ्यांच्या निवासासाठी इमारत हवी

  इच्छुक मालकांकडून प्रस्ताव आमंत्रित

अमरावती, दि. १३ : आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्र. ३ (क्षमता १०००), दस्तुर नगर, अमरावती येथे शिक्षणासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीचे विद्यार्थी वास्तव्यास आहेत. या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित, सुसज्ज व दर्जेदार निवासाची व्यवस्था करण्यासाठी सुमारे १८० विद्यार्थ्यांच्या क्षमतेची इमारत भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असून, इच्छुक इमारत मालकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत, असे आवाहन आदिवासी विकास विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

          भाडेतत्त्वावर घेण्यात येणारी इमारत अंदाजे १२५० चौ. मी. क्षेत्रफळाची आवश्यकता असून ती अमरावती शहराच्या मध्यवर्ती व शैक्षणिक परिसरात असावी. इमारतीमध्ये कार्यालय, विद्यार्थी निवास खोल्या, संगणक कक्ष, २० ते २५ शौचालये व स्नानगृहे, वाचनालय, भोजनकक्ष, प्रार्थना कक्ष, चौकीदार कक्ष, स्वतंत्र वाहनतळ, पुस्तकांसाठी रॅक, संरक्षण भिंत, टेबल-खुर्च्या, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीज, पंखे, अग्निशमन यंत्रणा तसेच सीसीटीव्ही व्यवस्था असणे आवश्यक आहे.

          इच्छुक इमारत मालकांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांसह आपले प्रस्ताव आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्र. ३ (क्षमता १०००), दस्तुर नगर, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. आवश्यक कागदपत्रांची यादी संबंधित कार्यालयात उपलब्ध आहे.

          प्राप्त प्रस्तावांची वरिष्ठ कार्यालयामार्फत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात येणार असून, त्यानंतर पात्र ठरणाऱ्या इमारतीस अंतिम मंजुरी देऊन ती भाडेतत्त्वावर घेण्यात येईल, अशी माहिती गृहप्रमुख आर. बी. तडवी यांनी दिली आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages