अमरावती, दि. २३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात काल जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, अधिक्षक निलेश खटके यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करून आदरांजली वाहिली.