अमरावती, दि. २३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ आणि राज्य शासनाच्या विविध योजनांतील 11 पात्र लाभार्थ्यांना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले.
यावेळी आमदार केवलराम काळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या प्रशासन महाव्यवस्थापक जयरेखा निकुंभ उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला. तसेच शासनाच्या विविध स्वयंरोजगार व आर्थिक सक्षमीकरण योजनांचा लाभ घेऊन उद्योग-व्यवसाय उभारण्याचे आवाहन केले. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचेही मतही उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.