अमरावती, दि. ०६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : केंद्रीय मोटार वाहन नियमान्वये महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविण्याची तरतूद केली आहे. वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांची अचूक ओळख पटविणे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे आवश्यक असून सर्वोच्च न्यायालयानेही तसे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांसह शासकीय, निमशासकीय कार्यालये व बँकांनी त्यांच्या 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक आहे. यापूर्वी यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती, परंतु आता ही मुदत वाढवून 30 जून 2026 पर्यंत करण्यात आली आहे.
विहित मुदतीनंतर एचएसआरपी नंबरप्लेट नसलेली वाहने किंवा बनावट एचएसआरपी असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, तसेच अशा वाहनांचे परिवहन कार्यालयातील कामकाज थांबविण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिला असून सर्व वाहनधारकांनी ३० जूनपूर्वी ही नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन केले आहे.
Post a Comment
0 Comments