31 जुलैपर्यंत मुदत
अमरावती, दि. ०६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह युनिट क्रमांक -4 (जेल रोड, अमरावती) आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह (नवीन) जेल रोड, अमरावती या दोन्ही वसतिगृह योजनांचा शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये लाभ घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या वसतिगृहांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी इयत्ता 11 वी, 12 वी तसेच सर्व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पात्र विद्यार्थिनींनी 15 ते 31 जुलै 2026 या कालावधीत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. संदर्भीय शासन निर्णयानुसार, ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, पात्र व इच्छुक विद्यार्थिनींनी दिलेल्या मुदतीत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments