Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

अनुसूचित जातीच्या शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू;


मोफत शिक्षणासह मिळणार विविध सुविधा

अमरावती, दि. ६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अमरावती जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी चालविण्यात येणाऱ्या शासकीय निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27  साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इयत्ता 6 वी ते 10 वी पर्यंतच्या पात्र विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये निवासी राहून सर्व सोयी-सुविधांसह मोफत शिक्षण दिले जाणार आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी निसर्गरम्य वातावरण, भव्य व सुसज्ज शासकीय इमारत, तज्ज्ञ शिक्षकवृंद, सुसज्ज ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, राहण्याची उत्तम व्यवस्था, मोफत शैक्षणिक साहित्य व गणवेश, खेळाचे साहित्य, नाश्ता व भोजनाची व्यवस्था तसेच अद्ययावत डिजिटल रुमद्वारे उत्कृष्ट अध्यापनाची सोय शासनातर्फे करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील मुलांसाठी नांदगांव खंडेश्वर (ता. नांदगांव खंडेश्वर), तुळजापुर (ता. चांदुर रेल्वे), सामदा (ता. दर्यापुर) व बेनोडा (ता. वरुड) येथे तर मुलींसाठी हिंगणगांव-कासारखेड (ता. धामणगांव रेल्वे), बुरडघाट (ता. अचलपुर) व पांढरी (ता. अंजनगांव सुर्जी) या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी अधिक माहितीकरिता व प्रवेश अर्जासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments