कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वुशू, कराटे व किक बॉक्सिंगची नेत्रदीपक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कु. गायत्री भोयर, कु. स्वरा कोंडे व कु. काव्या शर्मा यांनी उत्कृष्ट प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने कार्यक्रमात विशेष रंगत निर्माण झाली.
कार्यक्रमाचे मुख्य प्रशिक्षक व मार्गदर्शक मुकेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशिक्षक अनुरूप बंगाले व अनुप मानके यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी सादर केली. त्यांच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी वुशू, कराटे व किक बॉक्सिंगमधील विविध कौशल्यांचे प्रभावी प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवरूप कॉम्पॅक्ट ग्रुपचे सर्व प्रशिक्षक, विद्यार्थी व पालकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.
डॉ. राहुल अहिर
तालुका प्रतिनिधी, चांदूर बाजार 📰
Post a Comment
0 Comments