Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

सनदी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत सत्कार संपन्न


अमरावती दिनांक १० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
        श्री संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळ, अमरावती, असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स (इंडिया) - ACCE (I) ,अमरावती केंद्र तसेच आर. आर. लाहोटी विज्ञान महाविद्यालय  मोर्शी, माजी विद्यार्थी संघटना मोर्शी,जि.अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने भारत देशाच्या निवडणूक आयोगाच्या सचिव तथा  मुख्य निवडणूक अधिकारी, व अमरावती जिल्ह्याच्या सुकन्या सुप्रसिद्ध सनदी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांच्या कार्याचा गौरव व त्यांचा सत्कार सोहळा दि. ७ जून २०२६रोजी श्री.सभागृह, टोंगसे पाटील बिल्डकॉन सोल्युशनस् प्रा.लि. , आर्किटेक्चरल इ़ंजीनीअर्स, स्ट्रक्चरल इंजिनिअर्स.व  प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, अभियंता कॉलनी,विद्युत नगर, व्हि.एम.व्ही. रोड,अमरावती येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तमजी गावंडे होते. व्यासपीठावर सत्कारमूर्ती श्रीमती भाग्यश्री बानायत IAS, आर. आर. लाहोटी विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व मुख्य सल्लागार प्रा. दिलीपसिंह खांबरे,  असोसिएशन ऑफ कंसल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स (इंडिया), अमरावती केंद्र व मे. टोंगसे पाटील बिल्डकॉन सोल्यृशनस प्रा.लि. चे चेअरमन ,इंजि. श्रीकृष्ण टोंगसे, व मॅनेजींग डायरेक्टर  इंजि.नितीन टोंगसे,, ए.सी.सी‌ आय. (इं) अमरावती केंद्र,चे सचिव  तथा  बडनेरा काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग,चे उप प्राचार्य इंजी.प्रविण खांडवे,माजी उपशिक्षणाधिकारी व आर. आर. लाहोटी सायन्स कॉलेज मोर्शी च्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री.पंडित पंडागळे, अमरावती जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीचे अध्यक्ष तथा कामगार नेते श्री.दामोदर पवार आदी मान्यवर उपस्थित होते. 
    . सत्कारमूर्ती श्रीमती भाग्यश्री बानायत यांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजि. श्रीकृष्ण टोंगसे  यांनी केले.  अमरावतीची सुकन्या भाग्यश्री बानायत यांनी सहाय्यक आयुक्त पदापासून ते भारत निवडणूक आयोगाच्या सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी पदापर्यंत भरारी घेतली आहे.. त्यांचा सत्कार करण्याची संधी आज आम्हाला मिळाली हे आमचे अहोभाग्य आहे असे त्यांनी प्रास्ताविकातून मांडले .माजी प्राचार्य प्रा. दिलीपसिंह खांबरे यांनी सांगितले की, भाग्यश्री ही माझी विद्यार्थिनी असून तिने विद्यार्थीदशेपासून सनदी अधिकारी पदापर्यंतचा प्रवास जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने केला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने देशाच्या निवडणूक आयोगाच्या सचिव पदापर्यंत मजल मारणे ही गौरवाची बाब आहे. त्या उत्कृष्ट प्रशासकासोबत संवेदनशील लेखिका, कवयित्री आणि प्रगल्भ वक्त्या देखील आहेत.

 श्री.पंडित  पंडागळे म्हणाले, लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्या जनतेला न्याय देतील असा विश्वास आम्हा सर्वांनाच आहे.

दामोदर पवार यांनी सांगितले की, २०१२च्या IAS बॅचमधील महाराष्ट्रातील पहिल्या एकमेव महिला अधिकारी म्हणून त्यांनी कठोर परिश्रमाने ओळख निर्माण केली आहे. आपल्या उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्याने राष्ट्रीय स्तरावरच नाही तर आंतरराष्ट्रीय क्षेत्रात त्यांची कामगिरी गौरवास्पद आहे. 
सत्काराला उत्तर देताना श्रीमती भाग्यश्री बानायत म्हणाल्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडली म्हणूनच आज मी या पदावर पोहोचले. २००७मध्ये MPSC उत्तीर्ण झाल्यानंतर विक्रीकर विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदापासून त्यांच्या शासकिय प्रशासनिक सेवेला सुरुवात झाली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपसचिव गृह विभाग, व्यवस्थापकीय संचालक - महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ नागपूर, संचालक रेशीम संचालनालय नागपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी, आयुक्त महानगरपालिका नाशिक, आयुक्त-सचिव माहिती व जनसंपर्क विभाग नवी दिल्ली अशा विविध पदांवर कार्य केले.

2012 च्या IAS बॅचमधील महाराष्ट्रातील पहिली महिला अधिकारी बनण्याचा मान मिळाला तो त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण होता.   माझे यशाचे श्रेय माझे आईवडील आणि गुरू प्रा. दिलीपसिंह खांबरे सर आणि आमच्या काॅलेजच्या  प्राध्यापक वर्ग यांनाही आहे.  
त्यांना स्व.सुषमा स्वराज व मा. स्मृती इराणीजी यांच्या हस्ते 'उदयोन्मुख राज्य पुरस्कार' नवी दिल्ली-२०१९,या. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 'विदर्भ गौरव पुरस्कार' २०१६, मा.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 'नवभारत गव्हर्नन्स पुरस्कार' २०१९, स्कॉच राष्ट्रीय पुरस्कार २०२१, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रशासन भूषण पुरस्कार २०२२, सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२१ - अण्णा हजारे यांच्या हस्ते,व  वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन २०२१ असे अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.
त्या दक्षिण कोरिया येथे विकसनशील देशांच्या प्रशासनाचा अभ्यास करण्यासाठी गेल्या असून स्पेन येथे भारतीय निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले आहे. महाराष्ट्र टाइम्समध्ये 'सहज सुचलं' सदर लिहितात. 'स्वप्नगंध' हा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा जागृतीसाठी त्या विनामूल्य मार्गदर्शन करतात.
अध्यक्ष श्री पुरुषोत्तम गावंडे म्हणाले, निवडणूक आयोग हा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. ज्येष्ठ नागरिक हा देशाचा आधारस्तंभ आहे. भाग्यश्री यांचा सत्कार करणे हे आमचे अहो भाग्य आहे. त्यांना भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करण्याची संधी मिळो अशा शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपप्राचार्य व सचिव ,असोसिएशन ऑफ कंसल्टिंग सिव्हिल.इंजिनिअर्स (इं) अमरावती  सेंटर,प्रा.इंजी प्रविण खांडवे यांनी केले. कार्यक्रमाला प्रभाकरराव उमक, राजाभाऊ देशमुख, प्राचार्य दादाराव दाभाडे, चंदनसिंह राजपूत,धनराज निपाने, इंजि. संजय खोंडे, सौ. निताताई खोंडे, गजेंद्र पाथरे, सो.छायाताई पाथरे ,कु. साक्षी , सौ साधनाताई  उमक, अनिल वानखडे, मधुकर भोपळे, प्रा. सुरेश अंधारे,भास्कर रिठे, सुरेश शिर्के, ॲड. एस. डी. कपाळे, अशोक हांडे,नरेन्द्र तायडे, महात्मा फुले बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र आंडे, प्रा.बेलोकर,प्रा. प्रकाश चौधरी. श्री.काशिनाथ चौधरी ,प्रा.डॉ.विनय वसुले,जनता सह.बॅकेचे मुख्याधिकारी श्री. निमकर साहेब ,ए.सि.सि.आय. अम. चे पदाधिकारी ,इंजि.मुकुंद तिजारे, इंजी.राजिव भेले. इंजि.मिलींद पाटणकर , डॉ.किशोर हुरडे, किशोर श्रीराव, डाॅ. सुरेश चापोरकर, पुरूषोत्तम दारव्हेकर, गोपाल उताणे व सौ. उताणे,ॲड. धनंजय तोटे,राजीव सुखदेवे कु.साक्षी पाथरे.
यांच्यासह  ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. आईचे कौतुक पाहण्यासाठी श्रीमती भाग्यश्री मॅडम च्या दोनही मुली,कु. सनोजा व कु.सनोहा प्रामुख्याने उपस्थित होत्या. ईजि. नितीन टोंगसे आणि त्यांच्या चमुने कार्यक्रमाचे  नियोजन अतिउत्कृष्ट केले आहे.
Tags

Post a Comment

0 Comments