Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

वसतिगृह इमारतीसाठी प्रस्ताव आमंत्रित


*15 दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. १० (ग्रामीण उद्य्नेव्ज नेटवर्क) : इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील 100 विद्यार्थ्यांसाठी अमरावती येथे मुलांचे वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. या वसतिगृहासाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशी इमारत भाडेतत्त्वावर घ्यावयाची आहे. यासाठी 15 दिवसांच्या आत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासन निर्णयानुसार अंदाजे 9 हजार 200 चौरस फूट बांधकाम असलेली इमारत भाड्याने हवी आहे. शहरातील स्थानिक इच्छुक इमारत मालकांनी यासाठी आपले अर्ज सादर करावे लागणार आहे. इच्छुक इमारत मालकांनी आपले अर्ज विहित नमुन्यात सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, अमरावती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलिस आयुक्तालयाच्या मागे, चांदूर रेल्वे रोड, अमरावती येथे सादर करावेत.

अर्जाचा नमुना आणि यासंबंधीचा इतर संपूर्ण तपशील माहितीसाठी कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाचा ई-मेल आयडी adobbwoamravati@gmail.com येथे संपर्क साधता येईल. शहरातील इच्छुक इमारत मालकांनी मुदतीच्या आत अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक यांनी केले आहे.


Tags

Post a Comment

0 Comments