मोदींनी सर्वांनाच फसवले: अण्णा हजारेंची टीका - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, June 2, 2026

मोदींनी सर्वांनाच फसवले: अण्णा हजारेंची टीका




दि. २ राळेगण सिद्धी:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये देशवासीयांना 'अच्छे दिन' आणण्याचे दिलेले आश्वासन पूर्णपणे फोल ठरले आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि युवकांचा मोठा भ्रमनिरास केल्याचा आरोप त्यांनी केला.
 वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीमुळे आज सर्वसामान्यांचे जीवन अत्यंत कठीण झाले आहे. सरकारने दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केलेली नाहीत.
 शेतकऱ्यांना उत्पादनाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा म्हणजे 'बुडीत बँकेचा न वटणारा चेक' आहे, अशी टीका करत अण्णांनी शेतकऱ्यांना यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
 इराण आणि रशियाकडून मिळणारे स्वस्त इंधन बंद केल्यामुळे देशात इंधनाची प्रचंड दरवाढ झाली असून, सर्वसामान्य जनता होरपळत आहे. मोदी सरकारने देश अमेरिकेकडे गहाण टाकल्याचा आरोपही त्यांनी केला.
"मी एवढा थापाड्या पंतप्रधान पाहिला नाही"
अण्णा हजारे यांनी मोदींवर थेट शब्दांत निशाणा साधताना म्हटले:
"मी पंडित नेहरू यांच्यापासून आजवरचे सर्व पंतप्रधान पाहिले आहेत. परंतु, इतका थापाड्या आणि 'बोलबच्चन' पंतप्रधान मी कधीही पाहिला नाही. मोदींच्या गोड बोलण्याला आणि आश्वासनांना सुरुवातीला मीदेखील फसलो होतो. मात्र, गेल्या काही वर्षांत चित्र पूर्णपणे वेगळे दिसत आहे."
विकास आणि प्रगतीची खोटी स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या या सरकारने देशातील जनतेची केवळ निराशाच केली आहे, असेही हजारे शेवटी म्हणाले.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages