Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी अर्ज सुरु


अमरावती, दि. १० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): धामणगाव रेल्वे येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृहात शैक्षणिक सत्र 2026-27 साठी मोफत प्रवेश प्रक्रियेस सुरवात झाली आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग तसेच इतर पात्र प्रवर्गातील आठवीपासून उच्च व व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतील. विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम आणि वाय-फाय सुविधा विनामुल्य उपलब्ध होणार आहेत.

विद्यार्थ्यांना गुणवत्ता आणि रिक्त जागांनुसार वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना अर्जाची अंतिम मुदत 30 जून असून अकरावी व बिगर व्यावसायिक (महाविद्यालयीन) अभ्यासक्रमासाठी 15 जुलैपर्यंत अर्ज करता येतील. अर्जासाठी hmas.mahait.org संकेतस्थळाला भेट द्यावी, तसेच अधिक माहितीसाठी वसतिगृहातील गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments