Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतींच्या सदस्य आरक्षणाची सोडत जाहीर


अमरावती, दि. १० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : राज्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील सन 2024 आणि 2025 मध्ये मुदत संपलेल्या, तसेच सन 2026 च्या कालावधीत मुदत संपणाऱ्या नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्यांच्या आरक्षण निश्चितीचा आणि आरक्षण फिरवण्याचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 10 ते 12 जून 2026 या तीन दिवसांच्या कालावधीत राबविला जाणार आहे. नागरिकांनी आरक्षण सोडतीला उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments