अमरावती, दि. ९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : सेंट्रल बँक ऑफ इंडियाद्वारे शनिवार, दि. 6 जून रोजी दर्यापुर येथील माहेश्वरी भवन येथे मेगा कृषि ऋण मेळावा घेण्यात आला. यात 19 कोटी रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले.
नाबार्डच्या डीडीएम रश्मिता पंचाले अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नगर विकासचे सहआयुक्त डॉ. विकास खंडारे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक सचिन सुधाकर, क्षेत्रीय प्रमुख सुनील पाण्डेय उपस्थित होते.
श्री. पाण्डेय यांनी बँक विविध कृषि योजनामार्फत कृषि विकासासाठी कार्यरत आहे, देशातील कृषि उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वात कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करुन देत असल्याचे सांगितले. तसेच बँकेच्या विविध कर्ज योजनाची माहिती विनय वैश यांनी दिली. श्रीकांत पडवल यांनी सूत्रसंचालन केले. अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी आभार मानले.
Post a Comment
0 Comments