अमरावती, दि. 2 : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (MSACS), मुंबई अंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालय, अमरावती येथील आयसीटीसी (ICTC) केंद्रातील रिक्त 'प्रयोगशाळा तंत्रज्ञ' (Lab Technician) पद भरती प्रक्रियेला तांत्रिक कारणास्तव पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी एका पत्रकाव्दारे कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या कार्यालयीन आदेशानुसार, काही अपरिहार्य तांत्रिक कारणांमुळे ही रिक्त पदे भरण्यास स्थगिती देण्यात आली असून भरती प्रक्रिया तात्काळ थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार ही कार्यवाही होत आहे. यापूर्वी या रिक्त पदाच्या भरतीसाठी परवानगी देण्यात आली होती, मात्र आता प्रशासकीय कारणास्तव ही प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. तरी संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण केंद्राने प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
Post a Comment
0 Comments