Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य 20 मेपर्यंत नोंदणीचे आवाहन



 अमरावती, दि. 2 : राज्यात दि. 14 नोव्हेंबर 2024 पासून ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, दि. 15 एप्रिल 2025 पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी दि. 20 मेपर्यंत नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

राज्यात एकूण 1.71 कोटी खातेदार असून त्यापैकी 1.32 कोटी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणी पूर्ण केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी 20 मे 2026 पूर्वी आपला फार्मर आयडी तयार करून घ्यावे. शेतकरी नजिकच्या सेवा सुविधा केंद्रावर जाऊन अथवा स्वतः ॲग्रीस्टॅक पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करू शकतात. यापुढे कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच बियाणे, खते, औषधे आदी कृषी निविष्ठा प्राप्त करण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे.

फार्मर आयडी नोंदणीसंदर्भात काही अडचण आल्यास संबंधित विभागाच्या हेल्पडेस्कशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमरावती विभागासाठी अजितकुमार गेजगे (9657109809), पुणे विभाग करिता संगीता ननावरे (7588509492), कोकण विभागसाठी सोनाली वाडेकर (9404953518), छत्रपती संभाजीनगर विभाग शीतल कौदरे (9172319637), नागपूर विभाग अजितकुमार गेजगे (9657109809) व नाशिक विभाग सोनाली वाडेकर (9404953518) यावर संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाव्दारे करण्यात आले आहे.


  

Post a Comment

0 Comments