Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 8 मे रोजी:


जिल्ह्यातील तरुणांसाठी नोकरीची संधी

अमरावती, दि. ७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (मॉडेल करिअर सेंटर), अमरावती यांच्या वतीने शुक्रवार, दि. 8 मे 2026 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात श्रीराम इन्शुरन्स लि. (अमरावती), गार्डियन ट्रेनिंग अकादमी आणि सिक्युरिटी प्रा. लि. (हैदराबाद) यांसारख्या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून विविध पदांसाठी मुलाखती घेणार आहेत. पात्र उमेदवारांना निवडीनंतर लगेचच नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल.

इच्छुक उमेदवारांनी आपल्या अद्ययावत बायोडाटा, पासपोर्ट फोटो आणि आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, डेपो रोड, अमरावती येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. या मेळाव्यासाठी कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही. अधिक माहितीसाठी कार्यालयीन दूरध्वनी ०७२१-२५६६०६६ किंवा ८९८३४१९७९९/ ८६०५६५४०२५ या क्रमांकावर अथवा amravatirojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments