नोंदवण्याचे कामगार उप आयुक्तांचे आवाहन
अमरावती, दि. 07 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागामार्फत राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी नवीन कामगार संहितांच्या नियमावलीची घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत औद्योगिक संबंध संहिता आणि वेतन संहिता यांबाबतच्या अधिसुचना दि. 28 आणि 30 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या प्रस्तावित नियमावलीबाबत संबंधित व्यक्ती, कामगार संघटना आणि भागधारकांनी आपल्या हरकती व सूचना विहित मुदतीत नोंदवाव्यात, असे आवाहन अमरावती विभागाचे कामगार उप आयुक्त चं. अं. राऊत यांनी केले आहे.
औद्योगिक संबंध संहिता आणि वेतन संहिता यांसारख्या महत्त्वाच्या नियमांबाबत हरकती नोंदवण्यासाठी 45 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ज्या नागरिकांना किंवा संघटनांना या नियमावलीबाबत काही बदल सुचवायचे असतील, त्यांनी आपल्या सूचना लेखी स्वरूपात 'कामगार आयुक्त कार्यालय, कामगार भवन, बांद्रा-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई - 400 051' या पत्त्यावर पाठवाव्यात. तसेच, mh.labourcodes@gmail.com
Post a Comment
0 Comments