अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये अंशत: बदल

 


पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. ०२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): अमरावती  शहरात श्री क्षेत्र चांगापूर हनुमान मंदीर, चांगापूर अमरावती येथे दरवर्षी प्रमाणे हनुमान जयंतीच्या दिवशी मोठ्या संख्येने भावीकांची गर्दी असते.  दि. 02 एप्रिल  2026 गुरूवार, सकाळी 5 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासाठी पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी अधिसूचना जारी केली आहे.

सर्व वाहनांना वाहतूकीसाठी बंद करण्यात येणारे मार्ग

चांगापूर फाटा ते श्री हनुमान मंदीर चांगापूर हा मार्ग सर्व प्रकारच्या जड वाहनांकरीता प्रवेश बंदी राहील.

वाहतूकीस पर्यायी मार्ग

            चांगापूर फाटा ते श्री हनुमान मंदीर चांगापूर रेल्वे अंडर बायपास या मार्गे फक्त दर्शनाकरीता जाणार दुचाकी, चारचाकी वाहनांना प्रवेश राहील. हनुमान मंदीर चांगापूर येथे दर्शन घेवून परतणाऱ्या नागरिकांनी आपल्या दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी मंदीरा पासून बाहेर निघणार मार्ग- अयोध्या नगरी ले-आऊट ते रेवसा फाटा या मार्गाचा अवलंब करावा. पार्कीग व्यवस्था- मंदीर परिसरात वाहन पार्कींग फलक लावले असल्या त्याच ठिकाणीच वाहन धारकांनी वाहने पार्क करावे.

वाहतूक परिस्थितीनुसार वाहतूक थांबविणे व वळविणे याबाबत सर्व अधिकार वाहतूक विभागास राहील. तसेच अत्यावश्यक वेळी जनहित लक्षात घेता सहायक पोलीस आयुक्त वाहतुक अमरावती शहर यांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नियोजित अधिसूचनेमध्ये वाहतूकीच्या नियमनाबाबत अंशत: बदल करण्याचे अधिकार राहील.

या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक, वाहनधारकांवर मोटर वाहन अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी या कालावधीत सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Previous Post Next Post

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday