Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

क्वांटम संगणन तंत्रज्ञानामुळे सायबर सुरक्षेसमोर नवे आव्हान– आयबीएमचे संशोधन संचालक अमित सिंघी

 

                                                




                          आयबीएमचे संशोधन संचालक अमित सिंघी

 

मुंबईदि. १६ : आगामी काही वर्षांत संगणक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्याची क्षमता असलेले क्वांटम संगणन वेगाने विकसित होत असून जागतिक स्तरावर संशोधन व गुंतवणूक झपाट्याने वाढत आहे. या प्रगतीमुळे भविष्यातील सायबर सुरक्षेसमोर गंभीर आव्हाने उभी राहत असून यासाठी ‘क्वाटम-सेफ’ म्हणजेच क्वाटम-सुरक्षित धोरणात्मक सज्जता आवश्यक असल्याचे मत आयबीएम रिसर्चचे संचालक अमित सिंघी यांनी व्यक्त केले.

 

जागतिक क्वाटम दिनानिमित्त माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने आयोजित परिषदेत क्वाटम सुरक्षा आणि धोरणात्मक सज्जता या विषयावर संचालक  सिंघी बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवालमाहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विरेंद्र सिंगमहाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर आदी उपस्थित होते. यावेळी क्वॉंटम संगणक विषयातील जागतिक पातळीवरील घडामोडीधोके आणि भारतासाठीच्या संधी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

 

क्वांटम संगणन ही केवळ तांत्रिक क्रांती नसून आर्थिकऔद्योगिक आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरणार आहे. योग्य वेळी पावले उचलल्यास भारताला या क्षेत्रात आघाडी घेण्याची मोठी संधी उपलब्ध असल्याचे मत सिंघी यांनी यावेळी व्यक्त केले.

 

अमित सिंघी म्हणाले कीक्वाटम संगणनाचा वापर रसायनशास्त्रऔषधनिर्मितीशेतीलॉजिस्टिक्समशीन लर्निंग तसेच हवामान अंदाज यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. विशेषतः जटिल गणिती समस्या सोडविणेमोठ्या प्रमाणातील डेटामधून नमुने शोधणे आणि प्रथिनांच्या रचनेचा अभ्यास करणे यामध्ये या तंत्रज्ञानामुळे मोठी क्रांती अपेक्षित आहे. आर्थिक क्षेत्रातही क्वाटम संगणनामुळे अचूक अंदाज बांधण्याची क्षमता वाढत असून काही उदाहरणांमध्ये 30 टक्क्यांहून अधिक अचूकता सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले.

 

जागतिक स्तरावर क्वाटम संशोधनात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असताना भारतात या क्षेत्रात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. 2035 पर्यंत भारताला ‘क्वाटम सक्षम अर्थव्यवस्था’ बनविण्याचे उद्दिष्ट भारत सरकारने ठेवले असून त्यासाठी रोडमॅप तयार करण्यात आल्याचे  सिंघी यांनी यावेळी सांगितले.

 

अमित सिंघी म्हणाले कीसध्या वापरात असलेली सायबर सुरक्षा व्यवस्था ही गणिती कोडिंगवर आधारित असून ती अत्यंत मजबूत मानली जाते. मात्रया क्वाटम तंत्रज्ञानामुळे सायबर सुरक्षेसमोर मोठे आव्हानही उभे राहणार आहे. सध्या इंटरनेटबँकिंगडिजिटल व्यवहार यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रिप्टोग्राफी प्रणाली भविष्यात क्वाटम संगणकांमुळे मोडीत निघू शकतात. त्यामुळे बँकिंगडिजिटल पेमेंटई-मेलइंटरनेट प्रोटोकॉलब्लॉकचेन आणि शासकीय यंत्रणांतील माहिती सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आज डेटा सुरक्षित असला तरी भविष्यात तो उघड होण्याची शक्यता आहेअसेही त्यांनी यावेळी नमूद केले.

 

अमित सिंघी म्हणाले कीजगातील विविध तज्ज्ञांच्या मते2030 च्या दशकाच्या सुरुवातीस क्वाटम संगण इतके सक्षम होण्याची शक्यता आहे की ते पारंपरिक क्रिप्टोग्राफी मोडू शकतील. याच पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांनी ‘पोस्ट-क्वाटम क्रिप्टोग्राफी’कडे वाटचाल सुरू केली आहे. या संक्रमणासाठी सर्वप्रथम संस्थांनी आपल्या प्रणालीतील क्रिप्टोग्राफीचा सखोल आढावा घेणे आवश्यक आहे. त्यानंतर जोखीम मूल्यांकनधोरण आखणीअंमलबजावणी आणि सातत्याने निरीक्षण या टप्प्यांमधून ‘क्वाटम-सेफ’ प्रणाली विकसित करावी लागेल. यामध्ये शासकीय यंत्रणाखाजगी उद्योगशैक्षणिक संस्था आणि आंतरराष्ट्रीय मानक संस्था यांचे समन्वित प्रयत्न आवश्यक ठरणार आहेत.

 

क्वाटम सुरक्षेसाठी राष्ट्रीय स्तरावर जनजागृतीसशक्त प्रशासकीय यंत्रणातांत्रिक क्षमता विकाससंशोधन आणि नवोन्मेष यांना प्राधान्य देणे गरजेचे असून भविष्यातील सायबर सुरक्षेचा पाया आजच मजबूत करणे ही काळाची गरज असून त्यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केल.


Tags

Post a Comment

0 Comments