विशेष लेख _ आई वडील गुरुदेव - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, April 1, 2026

विशेष लेख _ आई वडील गुरुदेव

 


दि.२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):-

    "मातृदेवो भव पितृ देवो भव" आई-वडिलांना आपल्या आयुष्यात अनन्य साधारण स्थान आहे. ते आपले पहिले शिक्षक गुरु आणि प्रेरणास्थान आहे .त्यांच्याशिवाय आपले जीवन अपूर्ण असते आपल्याला घडवणारे तेच असतात कुठल्याही परिस्थितीमध्ये मुलांच्या भविष्यासाठी सुखासाठी ते नेहमी झटत असतात एक वेळ स्वतः जेवणार नाहीत पण मुलांचं शिक्षण मुलांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतात आपल्या जन्मानंतर आपल्याशी जोडली जाणारी दोन सर्वात घट्ट नाती म्हणजे आपले आई-बाबा स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ती आई असते आणि डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो तो बाबा आहे.

      या जगामध्ये दोनच खरे ज्योतिषी आहे. जी मनातलं ओळखतील ती आई आणि दुसरे म्हणजे जे मुलांचे भविष्य ओळखतात ते बाबा असतात आईच्या ममतेचा आणि बाबांच्या क्षमतेचा अंदाज लावणं हे नक्कीच कठीण आहे. परंतु आज समाजामध्ये  वृद्धाश्रम खचाखच भरलेले दिसत आहे .तसेच काही मुला मुलींना आपल्या आई-वडिलांशी बोलायला वेळ नसतो आपल्या कामात ते व्यस्त असतात म्हाताऱ्या आई-वडिलांची एकच अपेक्षा असते थोडा वेळ मुलांसोबत बोलावं मुलांची हालचाल विचारावी मुलांचा चेहरा जरी बघितला तरी त्यांना ते एखाद्या टॉनिक सारखं औषधीच काम करणार आहे. 

      काल-परवा मी एक बातमी बघितली ज्यामध्ये मुलगा शहरांमध्ये नोकरीवर आहे‌. त्याची आई  गावाकडे राहायची दररोज  मुलाला फोन करायची कसा आहेस जेवला का काय करतोस अशाप्रकारे बोलायची परंतु मुलगा तेच ते वाक्य ऐकून बोर व्हायचा कारण तो त्याच्या कामांमध्ये व्यस्त असायचा काही दिवसांनी फोनचं रूपांतर मेसेज मध्ये झालं आई त्याला मेसेजेस करायची कालांतराने मुलाने मेसेज वाचनही बंद केले व रिप्लाय म्हणून ठीक आहे. ओके असे लिहू लागला एकदा त्याला खूप मेसेज आला परंतु नेहमीप्रमाणे त्याने न वाचता ठीक आहे. ओके असे लिहिले काही दिवसानंतर गावाकडून त्याला एक फोन आला तेव्हा फार उशीर झालेला होता त्याच्या आईचा मृत्यू झालेला होता तेव्हा हा मुलगा गोंधळला रडू लागला त्याला फार पश्चाताप झाला मोबाईल मधील मागील मेसेज त्याने वाचले त्याचे आईने त्याला त्यामध्ये तिच्या आजाराबद्दल सांगितले होते हातपाय काम करत नाही याबद्दल सांगितले होते यावर काय करू असे सुद्धा विचारले होते परंतु याने ठीक आहे. असे उत्तर दिले होते परंतु  त्यावेळेस फार उशीर झालेला होता., यासाठी  मुलांचा आई-वडिलांशी संवाद आवश्यक आहे.

       तात्पर्य एकच आहे. आई-वडील आहेत तोपर्यंत त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे त्यांना थोडा का होईना वेळ दिला पाहिजे एकदा वेळ निघून गेली की काहीही उरत नाही. पौराणिक काळात तत्कालीन समाजाने आपल्याला अखरपक-अखोजी(सर्वप्रीती मोक्ष अमावस्या) अशासारखे सण साजरी करण्याचे सांगितलेले आहे. म्हणून मग आपण अखरपक अखोजी साजरी करण्यामागे लागतो आहे. त्याऐवजी आई वडील जिवंत आहे आहेत तोपर्यंत त्यांची काळजी घेतली त्यांना हवं नको ते विचारलं, आई-वडिलांना पोटभर जेऊ घातलं , आनंद दिला समाधान दिलं यातच खरं पुण्य, खरा आनंद आहे.तेव्हा  शेवटी एकच सांगते आई-वडिलांसारखं दैवत या जगात कुठेही नाही. बेभान होऊन जगल्यावरती सत्य आपल्याला दिसत नाही. सगळं मिळतं जगात ह्या, आईबाप पुन्हा मिळत नाही.

           ‌🙏🙏

सौ. सुरेखा दामेधर

 ‌‌(अध्यक्ष)

 विदर्भ (पश्चिम) 

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ 

( महिला मंच)

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages