Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

भूमी अभिलेख कार्यालयाला अत्याधुनिक उपकरण वाटप







अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): भूमी अभिलेख विभागामार्फत भूमापन दिनानिमित्त जमीन मोजणी कार्यवाहीच्या अत्याधुनिक उपकरणांचे वाटप जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

             यावेळी  आमदार सुलभाताई खोडके, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, केवलराम काळे, महापौर श्रीचंद तेजवानी, प्रवीण पोटे-पाटील, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, भूमिअभिलेख जिल्हा अधीक्षक महेशकुमार शिंदे यावेळी उपस्थित होते.  पालकमंत्री श्री बावनकुळे म्हणाले,नियोजित भूमापन मोजणीचा कालावधी कमी करून तो पंधरा दिवसांवर आणावा. त्यासाठी मोजणी साहित्य तसेच यंत्रसामुग्री देण्यात आले आहे. यापूर्वी नियमित मोजणीसाठी 90 दिवस तसेच द्रुगतीसाठी 30 दिवस असा कालावधी होता. हा कालावधी कमी करण्यात यावा. जिल्ह्यात या कामासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्यास जिल्हास्तरीय समितीमार्फत मनुष्यबळाची भरती करण्यात यावी. नगर भूमापनचे काम भू -नक्शा या प्रकल्पाखाली करण्यात येत आहे. हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राज्यात दहा ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. या स्तरावर जिल्ह्यातही प्रकल्प राबविण्यात यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाने खरेदी केलेल्या पाच वाहनांना पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी हिरवी झेंडी दाखविली. ही वाहने चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, वरूड तहसिलदारांना वितरीत करण्यात आले.


Post a Comment

0 Comments