Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

गुरुवर्य स्व. अंबादासपंत वैद्य मार्गाचे लोकार्पण, कुस्ती मॅट वितरण

 

     गुरुवर्य स्वर्गीय अंबादासपंत वैद्य 




श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या विकासासाठी कटिबद्ध - पालकमंत्री बावनकुळे

अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : गुरुवर्य स्वर्गीय अंबादासपंत वैद्य यांनी सन 1914 मध्ये स्थापन केलेले श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आजही राष्ट्रहिताच्या विचारावर अग्रेसर आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन संस्थेतून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांचे समर्पित कार्य आणि व्यक्तिमत्त्वाचे महत्व लक्षात घेता सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

गांधी चौक ते ओसवाल भवन मार्गाचे गुरुवर्य स्व. अंबादासपंत वैद्य मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. या निमित्ताने नामफलकाचे लोकार्पण, तसेच कुस्ती मॅट वितरण सोहळा काल शुक्रवार, दि. 10 एप्रिल रोजी पार पडला. मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते फलकाचे उद्घाटन, तसेच कुस्ती मॅटचे पूजन करण्यात आले. यावेळी मंडळाच्या वतीने पालकमंत्री श्री. बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला आमदार प्रविण तायडे, राजेश वानखडे, इतर मागासवर्ग आयोगाच्या सदस्य किरण महल्ले, अचलपूरच्या नगराध्यक्षा रुपाली माथने, प्रवीण पोटे, राजेश देशमुख, किरण पातुरकर, मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. डॉ. माधुरी चेंडके, डॉ. संजय तिरथकर, सुनील खराटे उपस्थित होते.

प्रा. डॉ. माधुरी चेंडके यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विजय पांडे आणि आशीष हटेकर यांनी सूत्रसंचालन केले.



Tags

Post a Comment

0 Comments