Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

"प्रलंबित कामांचा जागीच निपटारा; आमदार प्रवीण तायडेंच्या 'समाधान शिबिराने' उमलले नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य!"

 


"आमदार प्रवीण तायडेंचा संकल्प पूर्ण: 'समाधान शिबिरा'द्वारे शेकडो लाभार्थींच्या कामांचा निपटारा"

शिरजगाव कसबा दिनांक १२
अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण वसंतराव तायडे यांच्या पुढाकाराने आयोजित 'समाधान शिबिर' हे नागरिकांच्या प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. "चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी समाधान शिबिर" या संकल्पनेतून लोकांच्या समस्या जागेवरच सोडविण्यावर भर देण्यात आला आहे.
गोरगरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी समाधान शिबिर असल्याचे आमदार प्रवीण तायडे म्हणाले. ते  छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा आणि करजगाव या दोन राजस्व मंडळचे शिरजगाव कसबा येथील बालमुकुंद राठी विद्यालयातील शिबिरात अध्यक्षीय भाषनात बोलत होते.
प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत आणि प्रलंबित अर्जांवर त्वरित कार्यवाही व्हावी, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
कामांचा निपटारा: शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांचे स्टॉल्स लावण्यात आले असून, खालील कामांचा प्रामुख्याने निपटारा केला जात आहे:
महसूल विभाग: जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन-क्रिमिलेअर आणि रेशन कार्ड संदर्भातील तक्रारी.
कृषी विभाग: शेतकरी योजनांचे लाभ, पीक विमा आणि अनुदानाशी संबंधित समस्या.
आरोग्य विभाग: मोफत आरोग्य तपासणी, आयुष्मान भारत कार्ड वाटप आणि गरजू रुग्णांना मदतीचे मार्गदर्शन. 
समाज कल्याण: संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर पेन्शन योजनांचे अर्ज स्वीकारणे.
आमदार तायडे यांची भूमिका: आमदार प्रवीण तायडे स्वतः शिबिरात उपस्थित राहून लोकांच्या समस्या ऐकून घेत आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निर्णय घेण्याचे आदेश देत आहेत. "प्रशासकीय दिरंगाई दूर करून शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे" हे आपले ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 यावेळी मंचावर उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव ,  तहसीलदार सोनाली सूर्यवंशी ,  माजी जि. प. सभापती मनोहर सुने,संजय थेलकर,  साहेबराव अस्वार, बाळासाहेब सोनार,  धीरज जवंजाळ,  तथा भा. ज. पा. पदाधिकारी व   प्राचार्य श्री सुरडकर ,शाळेचे उपाध्यक्ष, श्यामसंदर राठी उपस्थित होते. सदर समाधान शिबीर मध्ये सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्याकडून ग्रामस्थांचे कामे व तक्रारीचा निपटारा एकाच ठिकाणी करण्यात आला. शिबीरमध्ये महसूल विभाग कडून मौजा देऊरवाडा व काजळी येथील एकूण २७ पुरुष शेतकरी यांनी  आपल्या पत्नीचे नाव ७/१२ मध्ये लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत सहधारक म्हणून लावण्यास संमती दिल्याने त्यांचे अभिनंदन करून सर्व महिलांना ७/१२ चे वाटप करण्यात आले,या ठिकाणी उपस्थित महिलांनी " '७/१२ वरील माझा हक लक्ष्मी मुक्ती योजनेमुळे शक्य"* असे घोषवाक्य केले तुकडेबंदी कायदा शासनाने शिथिल करून निवासी प्रयोजनार्थ १ गुंठा खरेदी असलेल्या लाभार्थी यांचे नावे फेरफार घेऊन ७/१२ वाटप करण्यात आले,, तसेच इतर अधिकार मधील तगाई कर्जाचे अनावश्यक नोंदी फेरफार घेऊन कमी करून ७/१२ वाटप करण्यात आले, ई राशन कार्ड वाटप तसेच संजय गांधी, श्रावण बाळ लाभार्थी यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. व इतर विभागाकडून ही शासनाचे विविध योजने अंतर्गत लाभ लाभार्थी यांना देण्यात आले.कार्यक्रम चे संचालन   मंडळ अधिकारी परवेज पठाण  यांनी केले.सदर शिबीर मध्ये महसूल विभाग, पंचायत समिती, कृषी विभाग, महिला व बाल्कल्याण विभाग, भूमी अभिलेख, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण विभाग, वन विभाग, परिवहन विभाग, दुयम निबंधक विभाग, सेतू केंद्र वरील सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच शिरजगांव कसबा व करजगांव महसूल मंडळ मधील मंडळ अधिकारी, सर्व ग्राम महसूल अधिकारी सर्व महसूल सेवक,ग्रामस्थ उपस्थित होते प्रस्तुत समाधान शिबिर यशस्वी करण्यासाठी मनोज सोनारकर नायब तहसीलदार चांदूरबाजार, लक्ष्मीकांत तिवारी निवासी नायब तहसीलदार चांदूरबाजार, सुमेध सोनवणे, अंकुश काळे उमेश तागडे परवेज पठाण, कविता नागले मंडळ अधिकारी, तलाठी मनीष खलोकार,सुनील पंचभाई, राजेश मसराम, संकेत घोरपडे, संजय चौधरी, वैभव मनोहर, राहुल जोशी, हर्षदा लव्हाळे, रक्षा डोलरवार, प्रफुल पाटील, मंगला गारोडे सह आदींनी यशस्वी ते करिता कसोशीचे प्रयत्न केले आहे.
लोकसहभाग: या उपक्रमाला मतदारसंघातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे काही तासांतच मार्गी लागत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

हा उपक्रम केवळ प्रशासकीय कामापुरता मर्यादित न राहता, जनतेचा सरकारवरील विश्वास वाढवणारा ठरला आहे.



    
          

Post a Comment

0 Comments