दि. ६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क ):-
आंबेडकरी व्यवहारात मौलिक योगदान देऊन साहित्य चळवळीला सम्यक दिशादर्शन करणारे आदरणीय ताराचंद्र खांडेकर यांनी तत्वनिष्ठ परिवर्तनवादी चळवळीत महत्त्वाचे कार्य केले आहे त्यामुळे ताराचंद्र खांडेकर यांच्या गौरवार्थ आंबेडकरी विचार समितीचे आयोजन करण्यात आले होते या समितीचे उद्घाटन डॉक्टर प्राध्यापक महेंद्र भवरे मुंबई विद्यापीठ मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले आपल्या उद्घाटनिय भाषणात डॉ महेंद्र भवरे यांनी चळवळीत काम केलेल्या कार्यकर्त्याच्या कार्याचे दस्तऐवजीकरण करणे अत्यंत गरजेचे असल्याचे आवर्जून सांगितले. जेणेकरून नवीन पिढीतील तरुणांना मागील पिढीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भविष्याची वाटचाल करता येईल सावित्रीबाई व महात्मा फुलांनी जे लिखाण केले ते जसे आजच्या तरुण तरुणींना आदर्शवत ठरले आहे तसेच पुढील पिढीसाठी जर आजच्या कार्यकर्त्यांच्या त्यागाचा आलेख समोर राहिला तर त्यांना यातून प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही आपल्या अध्यक्ष भाषणात माननीय ताराचंद्र खांडेकर यांनी समकालीन प्रश्नांवर विस्तृत चर्चा केली. आंबेडकरी विचार हा आज जागतिक चिंतनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे त्यातून सर्वकालिक कल्याणकारी विचारांची खरी ओळख होऊन त्यातून नवीन समाज घडविण्याची प्रक्रिया सुरू होते असे मत त्यांनी व्यक्त केले याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कारा वाल्देकर ,इमो नारनवरे ,नरेंद्र शेलार ,बबन चहांदे यांनी आपले विचार व्यक्त करताना फुले आंबेडकरांचे विचारातून या देशाचा उत्कर्ष साधता येईल असे प्रतिपादन केले.
पहिल्या दिवशी दिनांक २८ मार्च २६ ला आंबेडकरी गझल जागर कार्यक्रमाचे आयोजन इ.मो .नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले या कार्यक्रमात नंदकुमार दामोदरे ,सुदाम सोनुले ,संजय घरडे ,रोशन गजभिये ,देवीलाल रौराळे ,अतुल ढोणे ,अनिल अघम ,विनोद बागडे यांनी आपल्या गझल प्रस्तुत केल्या सूत्रसंचालन स्नेहल सोनटक्के हिने केले तर आभार कुंदा सोनुले यांनी मानले .
दुसऱ्या दिवशी २९ मार्च २०२६ ला सकाळी दहा वाजता तिसर्या सत्राचा प्रारंभ कवी संमेलनाने करण्यात आला .कवी संमेलनाचे अध्यक्षस्थानी मान. गोविंद वाघमारे हे होते .या कवी संमेलनात बबन चहांदे ,मोरेश्वर सहारे ,नारायण थोरात ,गौतम ढोके, गणेश लांडगे,संजय मोखडे यांनी आपल्या रचना सादर केल्या.
त्यानंतर झालेल्या दुसऱ्या परिसंवादात 'खांडेकरांचे साहित्य संस्कृती व चिंतन 'या विषयावर बोलताना खांडेकर हे आंबेडकरी चळवळीतील एक संघर्ष पुरुष आहे असे विधान प्राध्यापक सुखदेव ढाणके यांनी केले .खांडेकरांचे आर्थिक चिंतन या विषयावर बोलताना नरेंद्र शेलार यांनी खांडेकरांनी केलेल्या आंबेडकरवादी अर्थशास्त्रीय व श्रमिक कल्याण विषयक विचारांचा परामर्श घेतला माननीय इ .मोँ. नारनवरे यांनी खांडेकरांचे राजकीय चिंतन याविषयी विस्तृत भाष्य केले .परिसंवादाचे संचालन प्रा.डाॅ. गजानन बनसोड यांनी केले.
त्यानंतर दुसर्या परिसंवादात 'इसवी सन २००० नंतरचे आंबेडकरी साहित्य 'या विषयावर आकाशवाणीचे निवृत्त अधिकारी माननीय बबन चहांदे यांचे अध्यक्षतेखाली अभ्यास पूर्ण चर्चा केल्या गेली.या परिसंवादात आंबेडकरी साहित्यातील समीक्षा व सौंदर्यशास्त्रीय लेखन या विषयावर बोलताना प्रा डॉ अशोक इंगळे यांनी इसवी सन 2000 नंतरचे समीक्षा लेखन व सौंदर्यशास्त्रीय लेखनाचा चिकित्सकपणे आढावा घेतला याच परिसंवादात प्राध्यापक डॉक्टर भास्कर पाटील यांनी आंबेडकरी साहित्यातील वैचारिक लेखन विश्वात व्यापक पणे होणाऱ्या वैचारिक चिंतन या लेखनाचा आढावा घेतला प्राध्यापक डॉक्टर शांत रक्षित गावंडे यांनी इसवी सन 2000 नंतरचे आंबेडकरी नाट्यलेखन व रंगभूमी याविषयी सविस्तर भाष्य केले या परिसंवादाचे संचालन संजय मोखडे यांनी केले .
आंबेडकरी साहित्य संगीतीच्या शेवटच्या सत्रात झालेल्या समारोपीय कार्यक्रमात ज्येष्ठ लेखिका डॉक्टर आशा थोरात यांनी ताराचंद्र खांडेकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करीत आंबेडकरी चळवळीवर भाष्य केले याप्रसंगी आयुष्यमान अस्मिता खांडेकर मॅडम आयुष्यमान नारनवरे मॅडम आयुष्यमान वाल्देकर मॅडम आयुष्यमान वाघमारे मॅडम व आयुष्यमान मानवटकर मॅडम यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिला प्रबोधिनीच्या वतीने ह्रृद्य सत्कार करण्यात आला समारोपीय भाषण करताना माननीय ताराचंद्र खांडेकर यांनी आंबेडकरी विचार संगीतीच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले विचाराची सांगोपांग चर्चा सातत्याने व्हावी केवळ स्वतःला आंबेडकरवादी मानणे ने पुरेसे नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तित्व कार्य कर्तृत्व आणि विचारविश्व या विषयी निष्ठा असणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयुष्यमान सुदाम सोनुले यांनी केले
Post a Comment
0 Comments