जिल्ह्यात रेतीघाटांच्या लिलावातून 13.17 कोटींचा महसूल; महसूल वसुलीत मोठी झेप - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, April 15, 2026

जिल्ह्यात रेतीघाटांच्या लिलावातून 13.17 कोटींचा महसूल; महसूल वसुलीत मोठी झेप


 


अमरावती, दि. १६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये प्रशासकीय पारदर्शकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राबविण्यात आलेल्या रेतीघाट लिलाव प्रक्रियेला मोठे यश मिळाले असून, याद्वारे शासनाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची भर पडली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ऑनलाइन महाटेंडर प्रणालीद्वारे जिल्ह्यातील पर्यावरण अनुमती प्राप्त एकूण 53 रेतीघाटांच्या लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रक्रियेत 33 रेतीघाटांचा यशस्वी लिलाव झाला असून, त्यातून प्रशासनाला 12.17 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

जिल्ह्याच्या महसूल वाढीचा आलेख केवळ रेती लिलावापुरता मर्यादित नसून, गौणखनिज वसुलीमध्येही जिल्ह्याने लक्षणीय प्रगती केली आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अमरावती जिल्ह्याला 140 कोटी रुपयांचे गौणखनिज वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी आतापर्यंत 92.35 कोटी रुपयांची वसुली पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे, ही वसुली मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 23.63 कोटी रुपयांनी अधिक आहे. जिल्हा प्रशासनाने राबविलेली कार्यक्षम लिलाव पद्धत आणि गौणखनिजांच्या अवैध उपशावर ठेवलेले नियंत्रण यामुळे महसूल वाढीस मोठी चालना मिळाली आहे. 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages