भातकुली येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 100 उमेदवारांची प्राथमिक निवड - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, April 15, 2026

भातकुली येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 100 उमेदवारांची प्राथमिक निवड



अमरावती, दि. १६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती, मॉडेल करिअर सेंटर आणि महात्मा ज्योतिबा फुले कला आणि वाणिज्य महाविद्यालय, भातकुली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच स्थानिक महाविद्यालयाच्या प्रांगणात 'पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा' आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकऱ्यांच्या पाल्यांनी जास्तीत-जास्त प्रमाणात अशा मेळाव्यांतून रोजगार मिळवून स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे आवाहन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. जमदाडे, कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे डॉ. वानखडे आदी यावेळी उपस्थित होते.

यांनी ग्रामीण भागातील उमेदवारांनी रोजगारासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याचे धाडस करावे. तरुणांनी घराबाहेर पडून संधी शोधल्यास प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. या मेळाव्यामुळे मेळघाट आणि ग्रामीण भागाच्या विकासात मोलाचा हातभार लागेल,  असे श्रीमती बारस्कर म्हणाल्या.

 मेळाव्यात एकूण 10 नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. 200 हून अधिक रिक्त पदांसाठी सुमारे 234 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 180 उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या असून, मुलाखतीनंतर पात्र ठरलेल्या 100 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages