दि. २७
काल-परवाच एक पिक्चर बघितला "अगं -अगं सुनबाई काय म्हणतात सासुबाई " इतका मनाला भावला की अगदी मनाच्या गाभार्यातील एक स्त्रीमन हळवं झालं व फार भावनिक चटका लावून गेलं आजपर्यंत बरेच सिनेमे बघितले सासु सुनेवर होऊन गेले कशामध्ये खट्याळ सासू दाखवण्यात आली तर कशामध्ये नाठाळ सून दाखवण्यात आली आहे .हुंड्यासाठी छळणारी सासू बघितली परंतु हा सिनेमा मनाला एक घर करून गेला आहे .सासू आणि सून दोन्हीही महिलाच कधीतरी सासू सून असते आणि सून सासू होणार असते मग स्त्रीने स्त्रीला समजून घेऊ नये एखाद्या खंबीर मैत्रिणीसारखी सुनेच्या पाठीशी उभं राहायला हवं आणि तिला पाठिंबा द्यायला हवा सासूलासुद्धा काही काळानंतर तिचं माहेर पण काही का प्रमाणात कमी होतच असतं मग तिला सुद्धा स्वतःची सुखदुःख सांगायला आपली मैत्रीण हवीच असते म्हणून बदलत्या काळाबरोबर स्त्रियांनी सुद्धा बदलायला हवं आपल्या मुलासारखं मुलीसारखं प्रेम माया जीव जर सुनेला लावला तर ती सुद्धा तुमच्यामध्ये आई बघणारच हे सुद्धा सत्य आहे. आजच्या युगात पुरुषाबरोबरच स्त्रियांना सुद्धा घराबाहेर पडावं लागतं आपली नोकरी सांभाळून स्त्रिया घर पण सांभाळत असतात धकाधकीच्या जीवनामध्ये ताणतणाव हा प्रत्येकालाच येतो पण घरात आनंदी वातावरण असेल तर सगळं टेन्शन दूर पळून जातं हे वास्तव आहे. हे फार कठीण आहे, पण प्रयत्न करायला हवा आपलं कुटुंब आपला संसार सुखाचा ठेवायचा असेल तर बदलत्या काळाबरोबर बदलायला हवं अनिष्ट धार्मिक रूढी सांस्कृतिक रूढी परंपरा पौराणिक आणि घातलेले नियम ,रुढीच्या बेड्या झटकून स्वतःच्या व कुटुंबाच्या कल्याणासाठी हे करायला हवं, हे योग्य आहे.
काळानुसार दोघींचे विचार वेगवेगळे असणारच कारण व्यक्ती तितक्या प्रकृती असतात त्यामुळे मतभेद होणे साहजिकच आहे .जर सासु सुनेचे विचार पटले नाहीत तर शांतपणे चर्चा करून एकमेकींचं ऐकून घेऊन त्यावर तोडगा काढणे आणि स्वर्ण मध्य साधने हे सर्वात उत्तम मार्ग आहे. यामुळे वाद विकोपाला जाणार नाही आणि एकमेकींच्या विचारांचा आदर्श सुद्धा केला जाईल .या गोष्टीचा स्वीकार करावा लागेल तुम्ही एक हात समोर कराल तर नक्कीच पुढील हात आपल्या हातात राहील आणि हा विश्वासाचा आपुलकीचा असेल, तेव्हा प्रत्येकाची सून असं नक्कीच म्हणेल माहेर सोडलं मायेचं आता रडू की हसू आईसारख्या मायेची साथ लाभली मला प्रेमळ सासू आई मिळाली , आता हीच माझी आई, व मैत्रीणआहे.
सौ. सुरेखा दामेधर
अध्यक्ष
विदर्भ (पश्चिम )
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ
महिला मंच
Post a Comment
0 Comments