ऑनलाईन अर्ज भरण्यास 27 मार्चपासून सुरुवात
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जून रोजी
अमरावती, दि. २६ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) 21 जून रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदन अर्ज व परीक्षा शुल्क 27 मार्च ते 16 एप्रिल या कालावधीत भरता येणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चौथे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व मंडळाच्या, सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी पेपर 1, इयत्ता सहावी ते आठवीसाठी पेपर 2 या पध्दतीने परीक्षा घेतली जाते. त्यानुसार दि. 21 जून रोजी सकाळी साडेदहा ते एक यावेळेत पेपर 1 तर दुपारी 2.30 ते पाच या वेळेत पेपर 2 ची परीक्षा घेतली जाणार आहे.
ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क व अन्य माहिती परीक्षा परिषदेच्या htttps://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट 9 जून ते 21 जून दरम्यान उपलब्ध करुन दिल्या जाईल. प्रशासकीय अडचणींमुळे वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्ययावत माहिती परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल, याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे परीक्षा परिषदेव्दारे कळविण्यात आले आहे.
--
Post a Comment
0 Comments