भूमी अभिलेखचा तालुकास्तरावर जनता दरबार - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, February 22, 2026

भूमी अभिलेखचा तालुकास्तरावर जनता दरबार




अमरावती, दि.२३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातर्फे कामकाजाचा आढावा आणि प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी तालुकास्तरावर जनता दरबार घेणार आहे. यासाठी चांदूरबाजार, अचलपूर आणि चिखलदरा येथील सुधारीत कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.

यादरम्यान नागरिकांची जमिन मोजणी, नगर भूमापन, एकत्रिकरणाबाबत समस्या सोडविणार आहेत. तसेच या  कार्यालयाचे अधिनस्त असलेल्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबंधित दिवशी उपस्थित राहतील. सुधारीत वेळापत्रकानुसार, दि. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 1:30 यावेळेत चांदुर बाजार आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत अचलपूर उपअधीक्षक कार्यालयात जनता दरबार होणार आहे. दि. 9 मार्च रोजी दुपारी 12 ते 3 वाजता चिखलदरा येथे जनता दरबार घेण्यात येणार आहे. तक्रारींच्या तात्काळ निवारणासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक महेंद्रकुमार शिंदे यांनी केले आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages