सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा ‘मेगा रिटेल क्रेडिट आऊटरीच’ मेळावा संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, February 22, 2026

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा ‘मेगा रिटेल क्रेडिट आऊटरीच’ मेळावा संपन्न

 


ऑन-द-स्पॉट कर्ज मंजुरीची संधी

अमरावती, दि. २३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): स्वतःचे घर, हक्काची गाडी किंवा व्यवसायाचा विस्तार करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने, दि. 21 फेब्रुवारी 2026 रोजी शहरात 'मेगा रिटेल क्रेडिट आऊटरीच' कार्यक्रमांतर्गत विशेष ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा गाडगे नगर येथील संत गाडगे बाबा विसावा भवन येथे सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला होता.

या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ग्राहकांना त्यांच्या आर्थिक गरजांसाठी तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन मिळणार असून, पात्र अर्जांना 'ऑन-द-स्पॉट' प्राथमिक मंजुरी आणि चेक वितरण करण्यात येणार आले आहे. यामध्ये गृहकर्ज, वाहन कर्ज, व्यवसाय कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि इतर किरकोळ कर्ज सुविधांचा समावेश आहे. आकर्षक व्याजदर आणि सुलभ प्रक्रिया यावर या कार्यक्रमात भर दिला आहे.

नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी केले आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages